Breaking! पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के…, कोण-कोणत्या जिल्ह्यात भूकंप? वाचा…

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात ३.४ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे, सकाळी पावणे सात वाजता हे धक्के जाणवले आहेत.

    कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आजची सकाळ खूप धक्कादायक होती. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा (Kolhapur, Sangli and Satara) या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. (Earthquake In Kolhapur) कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात ३.४ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे, (Earthquake) सकाळी पावणे सात वाजता हे धक्के जाणवले आहेत. तसेच सांगली व सातऱ्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवलेत. (Earthquake shocks in West Maharashtra…, in which district earthquake shocks were felt)

    पहाटे जाणवले भूकंंपाचे धक्के…

    दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

    सिंधुदुर्गनंतर कोल्हापूरमध्ये भूकंपाचे धक्के

    गेल्या महिन्यात 29 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले आणि जमीनही हादरली होती. यानंतर आता कोल्हापूर, सांगली व साताऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यामुळं भीतीचे वातावरण आहे.