ed action on arjun khotkar

जालन्यातील सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत, त्याच कारखान्याची जमीन ईडीने (sugar factory land) तात्पूरती जप्ती आणली आहे. अवैध लिलाव केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

    मुंबई – शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर आज ईडीने (ED action) मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत, त्याच कारखान्याची जमीन ईडीने (sugar factory land) तात्पूरती जप्ती आणली आहे. अवैध लिलाव केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात इडीने पीएमएलए अंतर्गत सावरगाव हडप, तालुका आणि जिल्हा जालना, महाराष्ट्र येथील जालना सहकारी साखर कारखाना लि.ची जमीन, इमारत आणि संरचना, अवशिष्ट प्लांट आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे.