ईडीची मोठी कारवाई – मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना अटक

मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब देशमुख (ED Arrested Appasaheb Deshmukh) यांना अटक (Arrest) केली आहे.

    ईडीने (Ed) आज श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब देशमुख (ED Arrested Appasaheb Deshmukh) यांना अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडीने देशमुख यांना अटक केली आहे. पीएमएलए (PMLA) न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीकडे कोठडी दिली आहे.

    अप्पासाहेब देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीच्या यादीतील हे पाच नंबरचे आरोपी आहेत. गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीने आता अप्पासाहेब देशमुख यांना अटक केली आहे. अप्पासाहेब देशमुख हे डॉ. महादेव देशमुख यांचे सख्खे भाऊ आहेत.