Sanjay Raut's scathing statement on BJP's statement of 300 seats in Uttar Pradesh

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प जमीन गैरव्यवहारप्रकरणी (Patra Chawl Case) ईडीने मनी लॉन्ड्रींग (Money Laundering Case) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली असून सध्या संजय राऊत (Sanjay Raut)आर्थर रोड कारागृहात आहेत. सोमवारी पीएमएलए न्यायालयात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  मुंबई: गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने राऊतांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच सोमवारी सुनावणीदरम्यान ईडीच्यावतीने सादर करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल (Chargesheet Filed By ED) न्यायालयाकडून घेण्यात आली.

  गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रींग अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली असून सध्या संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. सोमवारी पीएमएलए न्यायालयात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  आरोपी नंबर ५
  पाच खंडाचे मिळून १ हजाराहून अधिक पानांच्या आरोपपत्रात राकेश, सारंग वाधवान, प्रवीण राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शननंतर संजय राऊत यांना आरोपपत्रात आरोपी नंबर ५ दाखविले आहे.

  राऊतांविरोधात थेट पुरावे
  संजय राऊत हे प्रविण राऊतच्या माध्यमांतून पडद्याआडून मुख्य सूत्रधार म्हणून व्यवहार करत होते. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्येही राऊतांचा सक्रिय सहभाग होता. दरम्यानच्या काळात राऊतांनी साक्षी पुराव्यांशी छेडछाड करून तपासयंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा दावा आरोपपत्रातून केला आहे. याशिवाय राऊतांनी या प्रकरणी साक्षीदाराला थेट धमकवल्याचेही पुरावे असल्याचा थेट आरोपही ईडीने केला आहे.

  प्रविण राऊतला एचडीआयएकडून ११२ कोटी
  संजय आणि वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून २००९ ते २०११ या काळात १ कोटी ०६ लाख ४४ हजार ३७५ रूपये प्रविण राऊतच्या खात्यात जमा झाले. तर एचडीआयएकडून प्रविण राऊतला ११२ कोटी मिळाले असल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.

  राऊतांकडून समानधानकारक उत्तर नाहीत
  राऊतांच्या भांडूप आणि दादरमधील निवासस्थानातील झडतीत अनेक कागदपत्र आणि रोकड हस्तगत झाली असून त्यात ११ लाख ५० हजारांची रोकड आणि अलिबाग पट्ट्यात ५ ठिकाणी जमिनींचे कोट्यवधीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आहेत. प्रविण राऊत, संजय राऊत, वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची भागिदारीत ११ कोटींची स्थावर मालमत्तेचे पुरावे असून आपल्या राजकीय बळाचा राऊतांनी वापर केल्याचे स्पष्ट झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

  ईडीचा जामीनाला विरोध
  या संपूर्ण प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे ही रक्कम राऊतांना कशासाठी मिळाली?, याचा तपास होणे गरजेचे आहे. त्यातच राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिलेले नाही. या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा राऊत करत असले तरी याच्याशी संबंधित अनेक बैठकांना त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पीएमएलएनुसार सखोल चौकशी आवश्यक असून ती पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये, असेही ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

  जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी
  ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याने राऊत यांनी जामीनासाठी नव्याने अर्ज दाखल करण्याची परवानगी मागितली. त्याची दखल घेत न्यायालयाने जामीन अर्जावर २१ सप्टेंबरला सुनावणी निश्‍चित केली.

  शिवसेना शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा
  सुनावणीसंपल्यानंतर राऊतांना दसरा मेळाव्याबाबत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा करणे ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार, परवानगी नाकारल्यास मैदानात घुसून मेळावा घेऊ अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.