राज कुंद्राच्या सीडीमागे ईडी लागली, ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात एफआयआर दाखल, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ  

मागील वर्षी पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्यावर्षी राज कुंद्राला अटक केली होती. तेव्हापासून राज कुंद्रा चांगलाच चर्चेत असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. या व्यवहारांचा आता ईडीकडून तपास केला जाणार आहे.

    मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासात आता ईडी अँकशन मूडमध्ये आली आहे. मागील वर्षी पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्यावर्षी राज कुंद्राला अटक केली होती. तेव्हापासून राज कुंद्रा चांगलाच चर्चेत असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. या व्यवहारांचा आता ईडीकडून तपास केला जाणार आहे.

    मुंबईतील एका बंगल्यामध्ये राज कुंद्रा अश्लिल फिल्म तयार करत असल्याच्या आरोपाने खळबळ उडाली होती. तसेच पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोन्ही कंपन्यांमध्ये करार होता. Kenrin ची मालकी राज कुंद्राच्या जवळच्या व्यक्तीकडे होती, तो ब्रिटनमध्ये राहतो. कुंद्रासह कंपनीचा आयटी हेड हेड रेयान थोरपे याला देखील अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आधीच गुन्हा नोंद आहे.

    दरम्यान, आता ईडीने पैशांची अफरातफर, परदेशातून झालेले पैशांचे व्यवहार यांची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. मागील वर्षी मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी धाड टाकली आणि राज कुंद्राला अटक केली. HotShots हे अॅप वापरले जात होते. तपासामध्ये हे अॅप युकेच्या Kenrin चे होते, परंतू ते राज कुंद्राच्या Viaan या कंपनीकडून चालविले जात होते असे आढळले. आता या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.