दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची आज ईडी चौकशी

    राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. काल (गुरुवारी) अनिल परबांची सलग तिसऱ्या दिवशी सहा तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर परबांना आज 11 वाजता पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं आहे. आज सलग चौथ्या दिवशी दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची ईडी चौकशी होणार आहे.

    ईडीनं अनिल परब यांना आज, शुक्रवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मागील तीन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास, बुधवारी जवळपास आठ तास, तर गुरुवारी सहा तास ईडीनं अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. आज अनिल परब यांना ईडीनं पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

    राज्यात सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे ढग गडद होत चालले आहेत. अशातच शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेना आमदारांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. अनेक आमदार ईडी (ED) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भितीमुळे शिंदे गटात सामील होत असल्याचं बोललं जात आहेत. तसेच, सत्ताधाऱ्यांकडूनही असेच आरोप केले जात आहे. एकिकडे शिवसेनेला (Shivsena) मोठं खिंडार पडलंय, तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. काल (गुरुवारी) अनिल परबांची सलग तिसऱ्या दिवशी सहा तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर परबांना आज 11 वाजता पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं आहे. आज सलग चौथ्या दिवशी दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची ईडी चौकशी होणार आहे.