sanjay raut varsha raut

संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात काही रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना एचडीआयएल (HDIL) ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. असं ईडीच्या निदर्शनास आले आहे.

    मुंबई : ईडीनं संजय राऊत यांना अटक (ED Arrest) केल्यानंतर सोमवारी कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळं राऊतांची आज ईडी कोठडी संपली होती, व यावर आज सुनावणी पार पडली. यानंतर पुन्हा त्यांना ८ ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ( sanjay raut ED has been remanded in custody till August 8) त्यानंतर पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊतावंर ईडीच्या कारवाईनंतर, आता राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना (varsh raut) ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.

    दरम्यान, राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात काही रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना एचडीआयएल (HDIL) ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता ईडीन वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

    काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

    मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. पत्राचाळीच्या जमीन व्यवहारात संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची ९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. याच प्रकरणी संजय राऊतांची १ जुलैला चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळीत राहणा-या नागरिकांची फसवणूकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.