मंत्री अनिल परब यांना ईडीचं समन्स; मंगळवारी चौकशीसाठी बोलावले

विधानपरिषद निवडणूक मतमोजणीच्या सुरु असताना एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना तिसऱ्यांदा ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांना चौकशीसाठी मंगळवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

    मुंबई : विधानपरिषद निवडणूक मतमोजणीच्या सुरु असताना एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना तिसऱ्यांदा ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांना चौकशीसाठी मंगळवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

    याआधी अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली होती. यानंतर ते शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ईडीची नोटीस मला कालच मिळाली. मी मुंबईत नसल्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ शकलो नाही. तसे ईडी कार्यालयाला कळविले आहे. मुंबईत गेल्यावर ईडी कार्यालयात जाईल. ते जे प्रश्न विचारतील त्याला उत्तरे देण्यासाठी मी बांधील आहे, असे त्यांनी सांगितले होते.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    ‘अनिल परब यांनी दापोलीतील रिसोर्ट विभास साठे यांच्याकडून विकत घेतला होता. यामध्ये १ कोटी १० लाखांचा व्यवहार झाला तसेच व्यवहारात साठे यांना काळा पैसा दिला’, आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ‘खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं’, तसेच ती जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.

    तसेचं “७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.”, असा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.