काँग्रेसचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’साठी संपादक मंडळाची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र (Congress Mouthpiece ) ‘जनमानसाची शिदोरी’ (Janmansachi Shidori) या मासिकाचे कामकाज सुलभ व गतिशिल व्हावे याकरिता संपादकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र (Congress Mouthpiece ) ‘जनमानसाची शिदोरी’ (Janmansachi Shidori) या मासिकाचे कामकाज सुलभ व गतिशिल व्हावे याकरिता संपादकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांची संपादकपदी तर डॉ. रत्नाकर महाजन यांची मुख्य सल्लागारपदी तसेच प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांची व्यवस्थापकीय समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    शिदोरीच्या कार्यकारी संपादकपदी दत्तात्रय खांडगे तर सदस्यपदी न. मा. जोशी, प्रशांत गावंडे, निरंजन टकले, भाऊसाहेब आजबे, राज कुलकर्णी व स्मिता शहापूरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.