तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ‘पंतप्रधान कुसुम योजने’चा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करा, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

"कुसुम व योजने अंतर्गत" शेतीला दिवसा ८ तास मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या योजनेचा फायदा घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ते या योजनेपासून समाधानी असल्याचे प्रमाणपत्र घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

    मुंबई : पंतप्रधान कुसुम योजनेची अंमलबजावणी व त्याचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्याचे निर्देश आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. कुसूम योजनेचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकारण (महाऊर्जा) याच्यासोबत मुंबई स्थित मराविम सुत्रधारी कंपनीच्या सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत डॉ. नितीन राऊत यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पंतप्रधान कुसुम योजना घटक ब योजनेचा आढावा घेतला. पंतप्रधान कुसुम ब योजनेअंतर्गत ५० हजार सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

    दरम्यान, ही योजना व त्याचे फायदे तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तिचा योग्य प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता असून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे डॉ राऊत यांनी यावेळी म्हटले. “कुसुम व योजने अंतर्गत” शेतीला दिवसा ८ तास मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या योजनेचा फायदा घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ते या योजनेपासून समाधानी असल्याचे प्रमाणपत्र घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.