पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी प्रयत्नशील :दिलीप वळसेपाटील 

पोंदेवाडीत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

    मंचर : यापूर्वी  रांजणगाव एमआयडीसीचे शिक्के काढले आहेत. जुन्नर तालुक्यातील शिक्केही  काढले आहेत. भविष्यकाळात पोंडेवाडीतील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याबाबत योग्य निर्णय घेऊ, अशी ग्वाही माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी दिली.

    पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथे मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी या इमारतीचे लोकार्पण  तसेच पाणी पुरवठा योजनेच्या व ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी वळसे-पाटील बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोक  मोहोळ, माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णकाका हिंगे, संजय गवारी, नंदा सोनावले, रामदास वळसे पाटील, रामदास जाधव, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, उपसरपंच महेंद्र पोखरकर, माजी सरपंच जयसिंग पोंदे, सदाशिव रोडे, मुख्याध्यापक संभाजी लोखंडे, अर्जुन महाराज वाळुंज,  सोमनाथ वाळुंज, सुशांत रोडे, आनंद पोंदे, अशोक दुगड, पोपट रोडे, भाऊसाहेब पोंदे, संतोष पोखरकर, अमोल वाळुंज, विठ्ठल मखर, सदाशिव पडवळ, अशोक वाळुंज, संतोष वाळुंज, अमित दौंण्ड, निलेश पडवळ आदी  उपस्थित होते.

    -जनावरांचे लसीकरण करुन घ्या
    वळसे पाटील म्हणाले, सध्या जनावरांमधे लंम्पि  नावाचा आजार आला असून त्यामुळे जनावरांचा  मृत्यू होऊ शकतो. यातून शेतकऱ्यांचे  लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी जनावरांचे लसिकरण करुन घ्यावे, असे आवाहन  वळसे पाटील यांनी केले.  यावेळी पोपटराव गावडे, अशोक मोहोळ, विवेक वळसे पाटील यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन  निलेश पडवळ यांनी केले. प्रास्ताविक अनिल वाळुंज यांनी केले.