विलेपार्लेत आठ ते दहा घरं कोसळली, मेट्रोच्या कामामुळे 40 पेक्षा जास्त घरांना तडे

मुंबईतील विलेपार्ले येथे मेट्रोच्या कामादरम्यान घरे कोसळल्याची घटना घडली आहे. तर, अनेक घरांना तडे गेल्याचा आरोप येथील नागिरकांनी केला आहे.

    मुंबई : विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे परिसरातील घरांना तडे जाऊन ती कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, 40 पेक्षा जास्त घरांना तडेही गेल्याच निदर्शनास आलं आहे. या घटनेमुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

    विलेपार्लेच्या इंदिरा नगर परिसरात मेट्रोचं काम सुरू आहे. यादरम्यान करण्यात आलेल्या खोदकामामुळे परिलसरातील जवळपास आठ ते दहा घरे कोसळली आहेत. तर काही जास्त घरांना तडे गेले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे घरांना हादरे बसत असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आलाी. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. स्थानिकांना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे.