एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांची भेट घेतल्याच्या चर्चाना उधाण

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या सुनबाई या दोघांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाल्या आहेत.

    मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत एका जाहीर सभेत बोलताना खडसे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. मात्र या भेटीच्या चर्चा निरर्थक असल्याचे एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आणि खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी म्हंटले आहे. प्रत्यक्ष खडसे आणि अमित शहा यांची भेट झाली नसली तरी, त्यांच्यात फोनवरून संवाद झाल्याची पुष्टी त्यांनी दिली आहे.

    एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्या भेटी संदर्भांत माध्यमांनी रक्षा खडसे यांना प्रश्न विचारला असता रक्षा खडसे म्हणाल्या, एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही. मात्र एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तसेच यावरून ज्यांना राजकारण करायचे असेल ते करणारच असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.