कितीही कट-कारस्थान करा, मी सर्वांना पुरुन उरेन, खडसेंचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळं विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा पाठी ससेमिरा लावायचा. माझा कितीही छळ केला मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या उरावर बसेन असा इशारा खडसेंनी शिंदे –फडणवीसांना दिला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेत बोलताना खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका केली.

    जळगाव – ईडी सरकार म्हणजे शिंद-फडणवीस सरकार रोज उठून कोणाच्या ना कोणच्या चौकश्या लावते आहे. त्यामुळं विरोधकांना नामोहरम करण्याचे काम हे ईडी सरकार करत आहे. विरोधक रोज म्हणतात की, कुछ ना कुछ होनेवाला है… मात्र कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ.. मला कितीही त्रास द्या, मी तुम्हा सर्वांना पुरुन उरेन, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते एकानाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे. यावेळी त्यांनी रवी राणा व बच्चू कडू यांच्या वादावर सुद्धा भाष्य केले. बंडखोरी ही कडू यांच्यापासून सुरु झाली आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात झाली आहे, असा दावा खडसे यांनी केला. त्यामुळं हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. असा टोला देखील शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

    दरम्यान, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळं विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा पाठी ससेमिरा लावायचा. माझा कितीही छळ केला मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या उरावर बसेन असा इशारा खडसेंनी शिंदे –फडणवीसांना दिला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेत बोलताना खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका केली. विरोधकांकडून सातत्याने छळ सुरु असून, मला अडविण्यात येत आहे. काहींना काहीतरी खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आहे. आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. पण जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेन. असा इशारा खडसेंनी दिला आहे.