eknath khadse

गोंदिया जिल्ह्यात महिलेवर झालेल्या (Gondia Rape Case) अत्याचाराबाबत विरोधी पक्षाने विधान परिषदेत (Maharashtra Assembly Session) गोंधळ घातला. यावरून तीन वेळा सभागृह तहकूब केले. तसेच चर्चेची मागणी केली. त्यावर दीपक केसरकर यांनी मंगळवारी सकाळी विरोधकांसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.

    मुंबई : गोंदिया येथे महिलेवर झालेला अत्याचार (Gondia Rape Case) हा राज्यातील महिलांवरील अत्याचाराचा कळस आहे. यामुळे महिला सुरक्षित आहेत की नाही, हा प्रश्न पडतो. त्यामुळे सभागृहात यापेक्षा महत्वाचा प्रश्न असू शकत नाही. महिलांना संरक्षण मिळून अशी परिस्थिती असेल तर गंभीर आहे, असे मत आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले.

    गोंदिया जिल्ह्यात महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत विरोधी पक्षाने विधान परिषदेत गोंधळ घातला. यावरून तीन वेळा सभागृह तहकूब केले. तसेच चर्चेची मागणी केली. त्यावर दीपक केसरकर यांनी मंगळवारी सकाळी विरोधकांसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.

    तसेच, घटनेचे गांभीर्य ओळखून संरक्षण मिळावे. कारधा पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आणि सदर महिलेला न्याय मिळावा अशी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुचना केली. तसेच, शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.