शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात; गिरीश महाजनांवर खडसेंची टीका

सध्या शेतकरी अनेक संकटांमध्ये आहे. शेतकरी अडचणीत आला असतांना त्यांना वाऱ्यावर सोडून गिरीश महाजन (Girish Mahajan) हे विदेशात गेल्याची घणाघाती टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. ते राष्ट्रवादीतर्फे आयोजित उपोषणाला भेटप्रसंगी बोलत होते.

    जामनेर : सध्या शेतकरी अनेक संकटांमध्ये आहे. शेतकरी अडचणीत आला असतांना त्यांना वाऱ्यावर सोडून गिरीश महाजन (Girish Mahajan) हे विदेशात गेल्याची घणाघाती टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. ते राष्ट्रवादीतर्फे आयोजीत उपोषणाला भेटप्रसंगी बोलत होते.

    शेतऱ्यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, पिक विमा कंपनीकडून मदत मिळावी, वन्यप्राण्यामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी एक दिवशी लक्षणिक उपोषण राष्ट्रवादीतर्फे जामनेर येथे करण्यात आले.

    जिल्ह्याकडे दुर्लक्ष 

    दरम्यान, खडसे पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथराव शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून, त्यांनी शेतकऱ्यांचा पिकाचा हमीभावासाठी बोललं पाहिजे. कारण आज जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही. एकेकाळी गिरीश महाजन यांनी कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते. मग आता गेले कुठे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते फॉरेन दौऱ्यावर फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.