Eknath Khadse Farming Dates in jalgon

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना शेतीची खूप आवड आहे. खडसे हे शेतामध्ये नवनवीन प्रयोग नियमित घेतानाचे चित्र पहायला मिळते. पन्नास एकर शेतामध्ये त्यांनी खजूर पिकाचा प्रयोग खानदेशामध्ये पहिल्यांदाच केला आहे व तो आता यशस्वी ठरला आहे(Eknath Khadse Farming Dates in jalgon ).

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना शेतीची खूप आवड आहे. खडसे हे शेतामध्ये नवनवीन प्रयोग नियमित घेतानाचे चित्र पहायला मिळते. पन्नास एकर शेतामध्ये त्यांनी खजूर पिकाचा प्रयोग खानदेशामध्ये पहिल्यांदाच केला आहे व तो आता यशस्वी ठरला आहे(Eknath Khadse Farming Dates in jalgon).

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी स्वतःच्या शेतामध्ये 50 एकर खजूर पिकाची लागवड केली आहे. या पिकाला आता पहिल्यांदाच फळ आलेला आहे.

    आखाती देशांमधून त्यांनी खजुराची रोपे मागवले आहेत. महाराष्ट्रात काही मोजक्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. परंतु खानदेशातला हा पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी ठरलेला आहे.

    खजूरला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. उत्पादनही चांगल्याप्रकारे मिळतं म्हणून एकनाथराव खडसे यांनी खजुराची लागवड केली आहे.

    आखाती देशातून साडेचार हजार रुपयाला एक रोप याप्रमाणे रोपांची खरेदी करून त्याची शेतामध्ये चार वर्षांपूर्वी लागवड केली होती व व्यवस्थितपणे निगराणी करत आता पहिल्यांदाच झाडाला फळे लागली आहेत.