eknath khadse

काही विषय हे भावनात्मक असतात. भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अनेक विषय बाहेर येतील, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितलं आहे.

    जळगाव : काही विषय हे भावनात्मक असतात. भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात . आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील असं राष्ट्रवादीचे (Rashtrawadi Congress) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे.  याकूब मेमन कबर प्रकरणी (Yakub Memon Tomb) राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.

    याकूब मेमनच्या कबरीबाबत नेमकी कोणी परवानगी दिली ही माहिती समोर येईल. तसंच या कबरीचं काम कायदेशीर की बेकायदेशीर हे सर्व चौकशीत समोर येईल. मात्र काही विषय हे भावनात्मक असतात.  भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने असे अनेक विषय बाहेर येतील, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

    मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभिकरण केल्याचा वाद सध्या सुरू झाला आहे. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे भाजपाकडून यासंदर्भात शिवसेनेवर आरोप केले जात असताना शिवसेनेकडून २०१५ मध्येच भाजपा सरकारच्या काळात ती कबर का बांधली गेली ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना आता मेमनची कबर असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनीच यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुशोभिकरणाचा दावा फेटाळून लावला आहे.