‘दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है…बदनाम किया है!’; एकनाथ खडसेंचा आपल्या जुन्या मित्रावर शब्दप्रहार

देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझी मोलाची मदत त्यांना झाली होती. विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या ५ टेबलच्या नंबर बसत होते मीच माझ्या जवळ घेऊन फडणवीस यांना बसवले.ाक

    जळगाव : पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसेंनी आपल्या जुन्या मित्रावर पुन्हा एकदा प्रहार केला आहे. हा जुना मित्र म्हणजे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जळगावमध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. तर ते प्रदेशाध्यक्ष कसे झाले होते याचीही आठवण करून दिली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझी मोलाची मदत त्यांना झाली होती. विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या ५ टेबलच्या नंबर बसत होते मीच माझ्या जवळ घेऊन फडणवीस यांना बसवले. विधानसभेत वारंवार देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मी त्यांना दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती देत तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले.

    त्यामुळे मी मित्रत्वाचं नातं जोपासले तरी त्यांनी माझ्या मागे एक षड्यंत्र कुभांड रचले मुख्यमंत्रिपदावरून मागे ठेवण्यात आले यावरूनच एक गाणं मला एका कार्यक्रमात आठवले ‘दुश्मन ना करे दोस्तने ऐसा काम किया है जिंदगीभर मुझे बदनाम किया’. अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.