शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ता बदलण्यात एक्सपर्ट; रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले की, हे सरकार काही लवकर जाणार नाही. अनेक जण म्हणत आहेत की हे सरकार जाणार आहे. जाणार असते तर हे सरकार आले असते कशाला? हे सरकार जाण्यासाठी आलेले नाही. हे सरकार पुढील २० वर्ष टिकणार आहे. ह्या सरकार कडून अनेक अपेक्षा आहेत.

    पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर विश्वास ठेवू नका. पुढील २० वर्ष हे सरकार पडणार नाही असा विश्वास केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.

    रामदास आठवले म्हणाले की, हे सरकार काही लवकर जाणार नाही. अनेक जण म्हणत आहेत की हे सरकार जाणार आहे. जाणार असते तर हे सरकार आले असते कशाला? हे सरकार जाण्यासाठी आलेले नाही. हे सरकार पुढील २० वर्ष टिकणार आहे. ह्या सरकार कडून अनेक अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार बदलण्यात तज्ञ (एक्सपर्ट) आहेत. त्यामुळे हे सरकार बदलले आहे. आताचे सरकार बदलेल अशी अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे रामदास आठवले म्हणाले.

    पुढे ते म्हणाले की, कोणामध्ये नाराजी असण्याच काही कारण नाही. सर्वांना मंत्री पद मिळणार नाहीत. मनात नाराजी असते. प्रत्येकाला वाटतं सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे पण ती मिळत नाही. मंत्री मंडळ हे ४०-४५ मंत्रीपदांचे असणार आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळेल असे नाही. विस्तार झाला की लोकं नाराज होतील आणि सरकार पडेल अशी वलग्ना विरोधकांकडून केली जाईल.