eknath shinde

    मुंबई – शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, ही पक्षाच्या आमदारांची भूमिका असेल तर त्याचीही तयारी आहे. पण, त्यासाठी तुम्ही २४ तासांत मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करावी, असा प्रस्ताव शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १२ असे एकूण ५२ आमदार असल्याची माहिती दिली आहे.

    संजय राऊत यांच्या प्रस्तावाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. याबद्दल आम्हाला काही माहितीदेखील नाही. आज होणाऱ्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.
    “आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत. त्यांची हिंदुत्वाची, विकासाची विचारसरणी आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छित होते. याच मुद्द्यावर ४० आमदारांचं एकमत आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं. मी अद्याप पक्ष सोडलेला नाही. मी शिवसेनेत असून शिवसैनिक आहे असंही त्यांनी सांगितलं.