एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा इर्शाळवाडीत ;  ग्रामस्थांना येत्या सहा महिन्यात घरे बांधून देणार, मुख्यमंत्र्याची ग्वाही

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर 20 जुलै रोजी रात्री 11 दरम्यान दरड कोसळली. दरड कोसळल्याने इर्शाळवाडीतील जवळपास 40 घरं दरडीखाली चिरडली गेली.इर्शाळवाडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अनेक गावकऱ्यांना दरड कोसळल्याने मृत्यू झाला.

    महाड : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर 20 जुलै रोजी रात्री 11 दरम्यान दरड कोसळली. दरड कोसळल्याने इर्शाळवाडीतील जवळपास 40 घरं दरडीखाली चिरडली गेली.इर्शाळवाडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अनेक गावकऱ्यांना दरड कोसळल्याने मृत्यू झाला. इर्शाळवाडीवर दुःखाचं डोंगर कोसळले. सरकार इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या पाठीशी ठीम उभे राहिले. सरकारने मदतीचा हात पुढे करत इथल्या रहिवाशांसाठी खालपूर चौक या भागात एक सुंदर गाव उभं केलं आहे. सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी असलेल्या निवारा केंद्राची पाहणी केली. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसह संवाद साधला. इर्शाळवाडी दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ग्रामस्थांच्या येथील ताप्तुरत्या निवारा केंद्रात एकूण 144 आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.

    सरकारकडून पुरवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये सकाळ,दुपार आणि संध्याकाळ 200 जणांचं जेवण, वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, 24 तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन,अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी रहिवाशांसाठी करण्यात आली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.

    दरम्यान या दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर राज्य सरकराने तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर आता इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आली आहे.