एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आणि दिवसभर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पाऊस

राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुजरातमध्ये गेल्यानंतर आज दिवसभर सोशल मीडियावर मीम्स (Mims and jokes on social media) आणि जोक्सचा पाऊस पडत आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे गुजरातमध्ये गेल्यानंतर आज दिवसभर सोशल मीडियावर मीम्स (Mims and jokes on social media) आणि जोक्सचा पाऊस पडत आहे.

    सरकार अस्तित्वात येऊन अडीच वर्ष होत आहे. महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी व पहाटेचा शपथविधी यावेळी सुद्धा सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा (Mims and jokes on social media) पाऊस असाच पाऊस पडत होता. दरम्यान, नवीन सरकार येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी शक्कल लढवत विविध मिम्स बनविले आहेत. नवीन भाजपाचे सरकार येणार असल्यामुळं एक नेटकऱ्याने “राज्यपाल तातडीने झोपायला निघाले… उद्या सकाळी बहुतेक पहाटे लवकर शपथविधीसाठी उठावे लागणार वाटतंय” तर दुसरीकडे धर्मवीर चित्रपटातील एक संवाद व्हायरल होत आहे. “एकनाथ कुठे हाय…असं धर्मवीर आनंद दिघे विचारतायेत…आणि थोड्या वेळाने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दाखविले आहे” असे अनेक आज दिवसभर मिम्स सोशल मीडियावर फिरत आहेत. यावेळी नेटकरी अधिक शक्कल लढवत विविध मिम्स बनवत आहेत.