एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ पदावरून हटवलं, शिंदे म्हणाले…

एकनाथ शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान सुरतमध्ये शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.

    मुंबई – महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुरतमध्ये पोहोचले आहेत. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे ११ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान सुरतमध्ये शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.


    ट्विटमध्ये काय म्हणाले एकनाथ शिंदे
    आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.