संजय शिरसाट यांचं पत्र ट्विटरवर शेअर करत एकनाथ शिंदेंनी साधला निशाणा

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat Letter To Chief Minister) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  या पत्राची सध्या चर्चा सुरु आहे. या पत्रातून शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा घणाघाती आरोप केला आहे.

    शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अनेक आमदार शिंदे गटाकडे जात आहेत. तसेच काही खासदार आणि नगरसेवकांचाही ओढा शिंदे गटाकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे. तसेच हे पत्र ट्विट करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘ही आहे आमदारांची भावना’, असं कॅप्शन दिलं आहे.

    शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  या पत्राची सध्या चर्चा सुरु आहे. या पत्रातून शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा घणाघाती आरोप केला आहे. तसेच सरकारची अडीच वर्ष आमच्यासाठी वर्षाची दारं बंद होती. आम्हाला वर्षाच्या गेटवर खूप वेळ वाट बघावी लागत असे, असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.

    शिरसाट यांनी पत्रातून संजय राऊतांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. आमच्या जीवावर राज्यसभेवर जाणाऱ्या बडव्यांनी तुम्हाला घेरलं आहे, असं शिरसाटांचं म्हणणं आहे.