eknath shinde

शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे  सुरतनंतर आता आमदारांना घेऊन गुहावटीत येथे थांबले आहेत. शिवसेनेच्या अर्ध्याहून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवत बंडखोरी करणाऱ्या शिंदे यांची राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची फक्त राज्यात चर्चा नाही तर थेट पाकिस्तानात सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे  सुरतनंतर आता आमदारांना घेऊन गुहावटीत येथे थांबले आहेत. शिवसेनेच्या अर्ध्याहून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवत बंडखोरी करणाऱ्या शिंदे यांची राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे.

    एकनाथ शिंदे यांची फक्त राज्यात चर्चा नाही तर थेट पाकिस्तानात सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील गुगल वर सर्वात जास्त सर्चिंग एकनाथ शिंदे यांच्या नावाचं झाल्याची माहिती समोर आली आहे. गुगलवरील सर्वाधिक ५४ टक्के सर्च एकनाथ शिंदे यांच्या नावाने झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात फक्त याच नावाची सर्चिंग केली जात असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

    तर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानं ४४ टक्के सर्चिंग झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावानं फक्त १ टक्के, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं १ टक्के आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं सुद्धा एक टक्के सर्चिंग पाकिस्तानात झाल्याची माहिती समोर आली आहे.

    गुवाहाटीतील हॉटेलमधील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत असलेल्या आमदारांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत ते पाकिस्तानला कसा धडा शिकवला. ती शक्ती आपल्या सोबत आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे बोलताना दिसत आहे.

    एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानचे नाव घेतल्यानंतर पाकिस्तानात त्यांच्या नावाची सर्चिंग जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे कोण आहेत?, त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे. ते कधी पासून राजकारणार आहेत, अशी माहिती गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाकिस्तानातील लोक सर्च करीत आहेत. पाकिस्तानमधील ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी एकनाथ शिंदे हा शब्द सर्च केला आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव फक्त पाकिस्तानात तर नव्हे तर सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान, कॅनडा, या देशातही सर्च केले जात आहे.