eknath shinde and uddhav thackeray

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेल्या प्रकरणावर ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

    नवी दिल्लीः एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेल्या प्रकरणावर उद्या म्हणजेच आता ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आज दोन्ही पक्षातील वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावरील सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

    राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला.