एकनाथ शिंदेंकडचे 18 आमदार आमचेच; विनायक राऊतांचा दावा

मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदरांची बैठक झाली. या बैठकीला 15 आमदार उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 18 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणखी चिघळला आहे

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार असून आणखी १० आमदार सोबत येतील, असा दावा शिंदे यांनी काल गुवाहटीच्या विमानतळाबाहेर केल्यानंतर आज शिवसेनेचे आणखी सहा आमदार गुवाहाटीला गेले आणि शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत.

    मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदरांची बैठक झाली. या बैठकीला 15 आमदार उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 18 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणखी चिघळला आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर लगेच राऊत यांनी हा दावा केल्यानं शिवसेनेतील कोणत्या गटाकडे सर्वाधिक आमदार आहेत? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    दरम्यान गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असे मानले जात होते. त्यावेळी शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचं दाखवून दिलं आहे.