संजय राऊतांच्या ‘परत या’ आवाहानानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्याकडे 40 आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत.

    दरम्यान अशातच नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी जीव धोक्यात घालून मी स्वतःची सुटका केली, असा दावा त्यांनी यात केला. यावर आता एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

    एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

    मी स्वतः आमची काही लोकं त्यांना सोडवण्यासाठी पाठवली होती. त्यांचे सर्व आरोप निराधार असल्याचं शिंदे म्हणाले आहेत. हे सर्व खोटं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांनी या परिषदेत बंडखोर आमदारांना असं आवाहन केलं होतं की तुम्ही २४ तासात परत या. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे 40 आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. अशी माहिती सुत्रानी दिली आहे.

    संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

    भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.