उद्धव ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेची साथ दिल्याने संजय राठोड यांच्या पत्नीला बसला जबरदस्त धक्का

महाराष्ट्रातील राजकारण विचित्र वळणावर आले आहे. क्षणक्षणाला धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. बंडखोर आमदारांच्या कृत्यामुळे त्यांचे कुटुंबिय देखील नाराज असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री संजय राठोड यांच्या घरात तणाव पहायला मिळत असून त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली आहे(Eknath Shinde's support against Uddhav Thackeray came as a shock to Sanjay Rathore's wife).

    मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण विचित्र वळणावर आले आहे. क्षणक्षणाला धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. बंडखोर आमदारांच्या कृत्यामुळे त्यांचे कुटुंबिय देखील नाराज असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री संजय राठोड यांच्या घरात तणाव पहायला मिळत असून त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली आहे(Eknath Shinde’s support against Uddhav Thackeray came as a shock to Sanjay Rathore’s wife).

    संजय राठोड यांच्या पत्नी शितल राठोड यांना बीपीचा त्रास सुरु झाला आहे. त्यांना जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्व राजकीय घडामोडींचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

    पूजा चव्हाण प्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर संजय राठोड राजकारणात पुन्हा सक्रिय झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून संजय राठोड हे घरुन नॉट रिचेबल होते.

    शिवसेना आमदारांची बंडखोरी सुरु असतानाच संजय राठोड एकनाथ शिंदेचा प्रस्ताव घेवून वर्षावर गेल्याने शितल राठोड यांना धक्का बसला आहे.

    काल दिवसभर संजय राठोड जेजे रुग्णालयात होते. मात्र, आज ते गुवाहाटीसाठी रवाना झाले आहेत.संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड यांची इच्छा आहे.