क्रेडिट कार्ड अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेला लाखोंचा गंडा

क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेशी संपर्क साधून पावणे पाच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेकडून गोपनीय माहिती घेऊन त्यांना ओटीपी देखील शेअर करण्यास भाग पाडले.

    पुणे : क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेशी संपर्क साधून पावणे पाच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेकडून गोपनीय माहिती घेऊन त्यांना ओटीपी देखील शेअर करण्यास भाग पाडले. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात ६६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी मोबाईल धारक महिलेवर गुन्हा नोंद केला आहे.

    तक्रारदार यांना महिलेने मोबाईलवर संपर्क साधून त्यांना क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, अशी बतावणी केली. त्यांच्याकडून कार्डची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना ओटीपी पाठवून तोही विचारला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४ लाख ८४ हजार रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.