
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार (NCP) यांनी पक्षावर दावा केला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरू आहे. सोमवारी (दि.20) केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार (NCP) यांनी पक्षावर दावा केला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरू आहे. सोमवारी (दि.20) केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागील निवडणुकीवेळी शरद पवार गटाने अजित पवार गटावर प्रतिज्ञापत्रांवरून मोठे आरोप केले होते. या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे. 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणी अजित पवार गटाने सलग सुनावणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सलग सुनावणी घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
मागील सुनावणीवेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली होती. मात्र, ते मुद्दे अजित पवार गटाने खोडून काढले होते. यानंतर आता पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणीपूर्वी दिल्लीत शरद पवार गटाची एक बैठक होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.
तांत्रिक मुद्दे समोर आणणार
गेल्या सुनावणीत काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत, असे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले होते. त्यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप करण्यात आला.