बलभीम विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

किणी (ता.हातकणंगले) येथील श्री बलभीम विकास सेवा संस्येची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी सुकमार बाळासो नेजकर तर व्हाईस चेअरमनपदी राहुल वसंतराव जाधव यांची निवड संस्थेच्या विशेष सभेत करण्यात आली.

    पेठ वडगाव : किणी (ता.हातकणंगले) येथील श्री बलभीम विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी सुकमार बाळासो नेजकर तर व्हाईस चेअरमनपदी राहुल वसंतराव जाधव यांची निवड संस्थेच्या विशेष सभेत करण्यात आली. गावचे नेते संजय बी. पाटील यांचे नेतृत्वाने व मार्गदर्शनाने निवडणूक बिनविरोध झाली.

    स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली सेवा संस्था अशी तालुक्यातील वेगळी ओळख असलेली ही संस्था कै. आनंदराव हवालदार दादा यांनी स्थापन केली. तर कै .बी एस. पाटील यांनी संस्थेचा उत्कर्ष केला. त्यानंतर आता गावचे नेते ऊद्योजक संजय बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची घोडदौड सुरू आहे.
    या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध झालेले नूतन सदस्य सुकमार बाळासो नेजकर, चेअरमन राहुल जाधव, व्हा. चेअरमन सुहास माने, प्रकाश शेळके, बाळगोंडा पाटील, रणजित निकम, जग्गनाथ बंडगर, रोहित पाटील, विजय पाटील, कुसुम हवालदार, मनिषा पाटील, धोंडिराम कुरणे, नूतन संचालक मंडळ असून, हातकणंगले संस्था उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थेचे सचिव आरिफ सौदागर यांनी सहकार्य केले.
    बलभीम सेवा संस्थेच्या बिनविरोध निवडीने ग्रामपंचायतीपासून सुरु झालेली सकारात्मक राजकारणाची वाटचाल अखंडीत सुरु असल्याचे चित्र दिसून आले. तर परिसरातील गावांना एक वेगळा आदर्श दाखवून दिला आहे. या निवडीसाठी नेते संजय पाटील यांच्यासह सहकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते, सभासद यांचे योगदान आहे.