बाजार समिती निवडणुकीचा एप्रिलमध्ये बिगूल; खानापूर व कडेगावसाठी सत्ताधारी-विराेधकांची माेर्चेबांधणी

खानापूर व कडेगाव तालुक्याची संयुक्त असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bajar Samiti) निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यात वाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. मतदारांची कच्ची यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.

विटा : खानापूर व कडेगाव तालुक्याची संयुक्त असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bajar Samiti) निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यात वाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. मतदारांची कच्ची यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाची संयुक्त सत्ता आली. मात्र वर्चस्व आमदार बाबर गटाचे असल्याचे दिसून येते. आमदार बाबर यांच्या गटाच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी जय्यत तयारी केली आहे.‌

गेल्या पाच वर्षांत सहा जणांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. नेत्यांनी पदाधिकाऱ्यांचा खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.‌ खानापूर व कडेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. गेली नऊ महिन्यांपासून बाजार समिती‌मध्ये प्रशासक कार्यरत आहे. सभासदांना यादी पाहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका निबंधक कार्यालय, पंचायत समिती कार्यालयामध्ये पाहण्यास उपलब्ध करून दिली आहे. ८ मार्च पर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे.‌ २० मार्च अंतिम मतदार प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूकीचा कार्यक्रम प्रत्यक्ष जाहीर होईल.‌ सोसायटी गटातून सभासदांना ११ सदस्य निवडण्याची संधी आहे. यामध्ये ७ जागा सर्वसाधारण जागेसाठी आहेत.

दोन महिलांच्यासाठी राखीव आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक तर मागास प्रवर्ग यांच्यासाठी एक अशा दोन जागा राखीव आहेत. ग्रामपंचायत गटामधून ४ जागा आहेत. दोन जागा खुल्या आहेत. एक मागासवर्गीय प्रवर्गासाठी व एक जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव आहे. व्यापाऱ्यांच्यातून दोन जागा निवडण्याचा अधिकार आहे. हमालांच्या मधून एक जागा निवडण्याचा अधिकार आहे.

सभापतिपद शोभेची बाहुली

एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत सहा जणांना सभापतीपदी बसण्याची संधी दिली आहे. पहिल्यांदा काॅग्रेस आनंदराव पाटील यांनी दिली. त्यानंतर तांदळगावचे चंद्रकांत चव्हाण यांनी दिली. मात्र त्यांच्यानंतर केवळ पंधरा दिवसांनी सभापती बदलण्यात आले. सभापतीपद हे केवळ शोभेची बाहुली बनल्याचे दिसून आले.‌