crime case has been filed against the person who assaulted the mahavitaran team a female electrical assistant was also abused in ajde village dombivali

महावितरणने गेल्या सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला असून त्यामुळे पुढील दोन वर्षांत प्रतियुनिटच्या दरात सरासरी एक रुपयाची वाढ होणार असल्याचे पंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी स्पष्ट केले आहे

    विज ग्राहकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे. आधीच महागाईचा (inflation) झटका बसलेल्या जनतेला आता महाविरणाचा मोठा झटका बसणार आहे. महावितरण विज दरात (electricity rate) वाढ करण्याची शक्यता आहे. महावितरणने (Mahavitaran ) बहुवार्षिक वीजदर निश्चिती अंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी 67 हजार कोटी रुपयांच्या महसुली मागणीसाठी वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दिला. त्यानुसार सरासरी 37 टक्के एवढी मोठी दरवाढ होऊ शकणार आहे. तसेच प्रतियुनिटचा विचार करता 2 रुपये 55 पैसे एवढी वाढ ग्राहकांच्या डोक्यावर पडणार असल्याने सर्वच वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. यामध्ये स्थिर आकार, वीज आकार व वहन आकाराचा समावेश आहे.

    वीज ग्राहक संघटनेच आक्षेप

    महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च 2020 रोजी मार्च 2025 अखेरपर्यंतच्या पाच वर्षांसाठी बहुवर्षीय वीजदरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे. तसेच वीज कायद्यातील तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी वीज पंपन्यांना वाढीव खर्चासाठी फेरआढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार महावितरणने 2023-24 साठी 8.90 रुपये प्रतियुनिट तर 2024-25 साठी 9.92 रुपये प्रतियुनिट दरवाढीची मागणी केली आहे. चालू वीज दराची विचार करता सदरची वाढ 14 टक्के आणि 11 टक्के एवढी असल्याचे दिसत आहे. ही ग्राहकांच्या डोळय़ांत धूळफेक करणारी आकडेवारी असून इंधन समायोजन आकारासह अन्या बाबींचा विचार करता प्रतियुनिटच्या वीज दरात 2.55 रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे.वीज दरवाढ करताना कोणत्याही परिस्थितीत 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करू नये असे निर्देश विद्युत अपिलीय प्राधिकरणाचे आहेत, मात्र त्याला महावितरणने हरताळ फासत मोठय़ा वीज दरवाढीची मागणी केली आहे.

    महसुली तूट भरून काढण्यासाठी खटाटोप

    महावितरणने गेल्या सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला असून त्यामुळे पुढील दोन वर्षांत प्रतियुनिटच्या दरात सरासरी एक रुपयाची वाढ होणार असल्याचे कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना काळात औद्योगिक ग्राहकांचा वीज वापर घटला होता, पण घरगुती आणि शेतकऱ्यांचा वीज वापर कयम होता. त्यामुळे त्यावेळच्या क्रॉस सबसिडीचा भारही या वीजदर वाढीत आहे.