वीजचोरीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत नाही ; साईनाथ आईस फॅक्टरीला जिल्हा न्यायालयाचा दणका

सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात आकारलेला ३५ लाख ८६ हजारांचा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे बजावत मा. जिल्हा न्यायालयाने साईनाथ आईस फॅक्टरीचा वीज पूर्ववत जोडून देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. 

    बारामती : सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात आकारलेला ३५ लाख ८६ हजारांचा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे बजावत मा. जिल्हा न्यायालयाने साईनाथ आईस फॅक्टरीचा वीज पूर्ववत जोडून देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. (District Court strikes Sainath Ice Factory)यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. (Electricity supply will not be restored without payment of electricity theft amount)
    सासवड येथे असलेल्या साईनाथ आईस फॅक्टरीची वीजचोरी ६ एप्रिल २०२२ रोजी उघडकीस आली होती. त्यावेळी या फॅक्टरीला २ लाख ३४ हजार २४३ युनीटची चोरी केल्याबद्दल ३५ लाख ८६ हजारांचा दंड आकारला होता. आकारलेल्या दंडाबाबत व वीजपुरवठा जोडून देण्याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक  नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले. त्यांनतर श्री. पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटक सुद्धा झाली होती.
    जिल्हा न्यायालयातही महावितरणने आकारलेला दंड भरावाच लागेल. दंडाची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा जोडून देता येणार नसल्याचे  न्यायालयाने सांगितले. दरम्यान वरील प्रकरण न्यायालयात असताना साईनाथ आईस फॅक्टरीने दुसऱ्यांदा मीटर बायपास करुन वीजचोरी केली. महावितरणच्या पुणे येथील भरारी पथकाने दि. १५ मार्च २०२३ रोजी ही वीजचोरी उघडकीस आणली. तेंव्हा या ग्राहकाला पुन्हा २२ लाख ३२ हजारांचा दंड आकारला. ही रक्कम ग्राहकाने भरली मात्र पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम अद्याप पूर्ण भरलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण रक्कम भरली जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणी महावितरणतर्फे ॲड. सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.