
धनगर समाजाला (Dhanagar Community) अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी या व अन्य मागण्यासाठी आज धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेळ्यामेंढ्यासह स्त्री पुरुष मोठ्या सख्येने सहभागी झाले होते.
तासगाव : धनगर समाजाला (Dhangar Community) अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी या व अन्य मागण्यासाठी आज धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेळ्यामेंढ्यासह स्त्री पुरुष मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने धनगर आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यात आला.
आरक्षण अमंबजावणी मागणीच्या या मोर्चाला जिजाऊ चौकातून सुरुवात झाली. मोर्चात हजारो धनगरबांधव सहभागी झाले होते. बसस्थानक चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याठिकाणी माजी जि प सदस्य संजय पाटील, प्रमोद शेंडगे, रामभाऊ थोरात, बालासाहेब एडके, ऍड विनायक पाटील, अधिकराव हजारे, मुकुंद ठोंबरे प्रभाकर पाटील, अर्जुन थोरात, संभाजी गावडे यांची भाषणे झाली. सुरुवातीला स्वागत विकास मस्के यांनी केले तर आभार उमेश गावडे यांनी मानले. तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात समाजाला घटनेमध्ये दिलेल्या एस. टी. आरक्षण (अनुसूचित जमाती) अंमलबजावणी करणेसाठी. तासगाव शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य असे स्मारक व अश्वारूढ पुतळा उभारणेसाठी जागा मिळावी धनगर बांधवांच्या मेंढपाळाच्या वर व त्यांच्या मेंढयावर हल्ले करणाऱ्याच्या वर अॅट्रॉसिटी सदृश्य गुन्हा दाखल करणेत यावा तसेंच त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे ४. मेंढपाळाच्या साठी चारा व कुरणे खुली करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील यांनी धनगर आरक्षण मागणीला पाठींबा दिला. खासदार संजय पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि पुतळा उभारणीसाठी पालिकेच्या वतीने जागा देण्याची घोषणा केली. स्मारकासाठी खासदार आणि आमदारांनी प्रत्येकी २५ लाख रुपयाची मदत करण्याची करण्याची घोषणा केली. जि.म. बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनीही आरक्षण मागणीला पाठिंबा दिला.