अंबरनाथ महापालिकेच्या युपीएससी भवनात कर्मचाऱ्यांची रंगली दारू पार्टी

अंबरनाथ पालिकेतील सफाई कर्मचारी आणि त्यांचे मुकादम या दारू पार्टी मध्ये सहभागी झाले होते. स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन मिळून अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत, या उद्देशाने अंबरनाथ पालिकेने ३ कोटी रुपये खर्चून पूर्वेच्या गावदेवी मंदिराशेजारी युपीएससी भवन उभारले आहे.

    कल्याण : होळीच्या (Holi 2022) एक दिवस आधी अंबरनाथ महापालिकेच्या (Ambernath Municipal Corporation) कर्मचाऱ्यांची युपीएससी भवनामध्ये (UPSC Bhavan) चक्क दारू पार्टी (Alcohol Party) रंगली होती. माजी नगरसेवक सुभाष साळुंके (Former Corporator Subhash Salunke) यांनी हा प्रकार समोर आणला असून त्यांनी  या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

    अंबरनाथ पालिकेतील सफाई कर्मचारी आणि त्यांचे मुकादम या दारू पार्टी मध्ये सहभागी झाले होते. स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन मिळून अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत, या उद्देशाने अंबरनाथ पालिकेने ३ कोटी रुपये खर्चून पूर्वेच्या गावदेवी मंदिराशेजारी युपीएससी भवन उभारले आहे.

    मात्र या युपीएससी भवनात चक्क दारू पार्टी रंगल्याने इथला सुरक्षारक्षक नक्की काय करत होता असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. दरम्यान आता या प्रकरणी पालिका प्रशासन काय भूमिका घेते हेच पाहावं लागेल.