महिलांच सबलीकरण हेच आमचे धोरण ;  माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा अमरीन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

महिलांच सबलीकरण हेच माऊली महिला विकास संस्थेचे धोरण आहे. असे प्रतिपादन माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा अमरिन मुश्रीफ यांनी केले.

    कागल : महिलांच सबलीकरण हेच माऊली महिला विकास संस्थेचे धोरण आहे. असे प्रतिपादन माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा अमरिन मुश्रीफ यांनी केले.

    शाहू हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी स्पेशल प्रशिक्षणा प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा संगीता प्रकाशराव गाडेकर होत्या. मुश्रीफ म्हणाल्या, आमदार हसन मुश्रीफ गेली पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीस माता-भगिनीचे योगदान मोठे आहे. महिलांना घरच्या घरी किंबहुना गावात रोजगार मिळून अर्थार्जनातून आर्थिक साक्षरता यावी. हाच माऊली महिला विकास संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कागल शहराध्यक्षा पद्मजा भालबर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणात माऊली महिला विकास संस्थेच्या मुख्य प्रशिक्षिका गंधाली दिंडे यांनी दिवाळी स्पेशल प्रशिक्षणामध्ये उटणे, आकर्षक पणत्या, मोती साबण, वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्ती, सुगंधित अगरबत्ती, चॉकलेटचे प्रकार, सुगंधीत तेल यासह औद्योगिक स्वरूपाचे पॅकिंग व लेबलिंग शिकवण्यात आले. यावेळी नगरसेविका माधवी मोरबाळे, मंगल गुरव, दिपाली भुरले, आशाकाकी जगदाळे, रुपाली काळबर, शैनाज अत्तार, रंजना सणगर, अनिता चितारी, सुषमा पाटील, माधवी प्रभावळकर व महिला उपस्थित होत्या.