पाचगणी येथील टेबललॅंन्ड पठारावर अतिक्रमण हटवले

पाचगणी गिरीस्थान पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. आज सोमवारी टेबललॅंन्ड पठारावरील अनधिकृत पत्र्याचे स्टाॅल पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुपारी जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. ही मोहीम अचानक राबवल्यांने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

    पाचगणी : पाचगणी गिरीस्थान पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. आज सोमवारी टेबललॅंन्ड पठारावरील अनधिकृत पत्र्याचे स्टाॅल पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुपारी जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. ही मोहीम अचानक राबवल्यांने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

    आज सकाळी पांचगणी गिरिस्थान पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव कामगारांचा अतिक्रमण विभागाला घेऊन पोलिस बंदोबस्तात टेबललॅंन्ड पठारावर आले. जे स्टॉल काढायचे आहे त्या दुकानासमोर पथक येताच काहीं काळ तणाव निर्माण झाला. सदर स्टाॅल हा कोर्टाने मान्य केलेल्या यादी मधीलच असल्याबाबत स्टाॅलचे मालक व पालिका कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या गोंधळातच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने सदर स्टाॅल काढून टाकला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले.