दहा वर्षांत देशातील आतंकवाद संपवला; केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांची जाहीरसभा झाली.

    किनगाव : लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांची जाहीरसभा झाली. ‘2014 पूर्वी भारत देशात भ्रष्टाचार, आतंकवाद माजला होता, तो मोदी सरकारने संपवून टाकला असून, सन्मान भारताचा जगभर वाढला आहे. 10 वर्षे ट्रेलर होता खरा पिक्चर बाकी आहे’, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

    देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. अर्थव्यवस्था सुधारली असून, किसान सन्मान योजना, जनधन खाते, किसान क्रेडिट कार्ड’ मोफत घरे , 100 रूपये गॅस, शौचालये बांधून हगणदरीमुक्त गावे केली. व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज दिले. ही मोदीची गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.

    सुधाकर श्रृंगारे यांना दुसऱ्यांदा खासदार बनवायचे आहे, परत मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. यासाठी मोदीला मत म्हणजे विकासाला मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.