काँग्रेसची पेज ३ संस्कृती! ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाचा शिबिराच्या नावाखाली धांगडधिंगा

काँग्रेसची पेज ३ संस्कृती पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या माध्यमातून शिबिराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी आयोजित करण्यात आली होती.या मध्ये अनेक अनैतिक गोष्टी घडल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे( Energy Minister Nitin Raut's son misbehaves under the guise of camp ).

    काँग्रेसची पेज ३ संस्कृती पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या माध्यमातून शिबिराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी आयोजित करण्यात आली होती.या मध्ये अनेक अनैतिक गोष्टी घडल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे( Energy Minister Nitin Raut’s son misbehaves under the guise of camp ).

    करोडो रुपये खर्च करून मिळविलेले अध्यक्ष पद, त्यात वडिलांच्या सरकारी खात्याचा केलेला दुरुपयोग ,करोडो रुपये खर्च करून स्वतःचा करून घेतलेला पदग्रहण सोहोळा आणि आता करोडो रुपये खर्च करून केलेल्या या अनैतिक धांगडधिंगा पार्ट्या या सर्व विषयाच्या तारा थेट ऊर्जा खात्याशी जुळल्या आहेत का? असा सवाल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

    ऊर्जा खात्यातील कंत्राटदारांची पिळवणूक करून या करोडो रुपयांची तरतूद केली गेली का?या सर्व विषयांची सखोल चौकशी व्हावी ही मागणीही त्यांनी केली आहे.