विद्यापीठातील इंग्रजी विभाग पुन्हा वादाच्या भोव-यात

संशायास्पद पीएचडी प्रकरण: कुलगुरूंकडे उमेदवारांची तक्रार; कुलगुरूंनी मागविली इंग्रजी विभागाची कुंडली (माहिती)

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंग्रजी विभाग हा एकेकाळी अतिशय प्रतिष्ठित प्राध्यापकांच्या गुणवत्ता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यांमुळे नावाजलेला होता; परंतु ही तज्ञ मंडळी रिटायर्ड झाल्यानंतर मात्र या विभागाला गुणवत्तेच्या बाबतीत उतरती कळा येऊ लागली असुन सध्या इंग्रजी विभागाला कुणीही वाली राहीलेला नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या विभागात फक्त दोन पुर्ण वेळ प्राध्यापक आहेत आणि इतर सीएचबी तत्वावर काम करणारे प्राध्यापक आहेत. परंतु या विभागाची अवस्था पाहीली तर पहील्या प्राध्यापकांच्या तुलनेत आताच्या प्राध्यापकांमध्ये गुणवत्तेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे त्याचा परीणाम विद्यार्थ्यांवर तर होतोच परंतु पीजी व पीएचडी सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये देखील ब-याच गोष्टी चुकीच्या होतांना दिसून येतात. याचाच प्रत्यय इंग्रजी विभागामार्फत घेतल्या गेलेल्या पीएचडी मुलाखती प्रसंगी दिसून आला. इंग्रजी विभागामार्फत घेतल्या गेलेल्या निवड समितीत पाच पैकी तीनच सदस्य मुलाखत घेण्यासाठी हजर होते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर व सर्व नियम धाब्यावर बसुन राबविली गेल आहे.असे पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांंनी तक्रार केली आहे. म्हणून इंग्रजी विभागामार्फत घेतली गेलेली ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नवीन पीएचडी च्या मार्गदर्शक तत्वानुसार व पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात यावी अशी तक्रार तक्रादार विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे केली आहे.

    पहील्या व दुसऱ्या फेरीतील संशायास्पद निवड समिती

    इंग्रजी विभागात मार्फत घेतल्या गेलेल्या पहिल्या फेरीच्या वेळी विद्यापीठातर्फे पाच सदस्यीय निवड समीतीची स्थापना करण्यात आली होती. परंतु पाच ऐवजी तीनच सदस्य मुलाखतीस हजर होते. त्यामुळे या संपूर्ण संशयास्पद प्रक्रियेला उमेदवारांनी कुलगुरूंकडे तक्रार करुन तीव्र विरोध केला होता. उमेदवारांच्या या तक्रारीला रीतसर उत्तर न देता विभागामार्फत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पहील्या फेरीत वादाच्या भोव-यात सापडलेली असतांनाच  तेच सदस्य असलेली निवड समितीची पुन्हा इंंग्रजी विभागामार्फत घेतल्या गेलेल्या दुसऱ्या फेरीत देखील पुनरावृत्ती करण्यात आली. त्यामुळे दोन्ही फेरीतील निवड समिती संशयास्पद आहे. असे तक्रारदार उमेदवारांनी तक्रारीत म्हटले आहे.