अनौपचारिक शिक्षणातून मुलांची गुणवत्ता वाढवा ; सीईओ दिलीप स्वामी यांचे आवाहन

अनौपचारिक शिक्षणातून बालकांची गुणवत्ता वाढवा. हर घर तिरंगा व सायकल बँक उपक्रमाची जनजागृती करा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

  पंढरपूर : अनौपचारिक शिक्षणातून बालकांची गुणवत्ता वाढवा. हर घर तिरंगा व सायकल बँक उपक्रमाची जनजागृती करा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

  पंढरपूर पंचायत समितीचे शेतकरी सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने आरंभ प्रशिक्षणाचा शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, राज्य प्रशिक्षक कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, अनुराधा शिंदे, व जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षीका उपस्थित होत्या.

  स्वामी म्हणाले, अंगणवाडीचा उद्देश केवळ बालकांचा पूरक आहारातून शारिरीक विकास करणे इतकाच नसून अनौपचारिक शिक्षणातून बौध्दिक विकास करणे हा देखील आहे. बालक घरामध्ये असताना देखील त्याचा छोट्या गोष्टीतून विकास कसा करावा याबाबत पालकांना देखील प्रशिक्षीत करणे गरजेचे आहे.

  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केंद्र शासनाचा हर घर तिरंगा उपक्रम व मुलींची शाळा गळती रोखणेसाठी जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेला सायकल बँक या उपक्रमाबाबत जनजागृती करून दोन्ही उपक्रम यशस्वीपणे राबविणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.

  पूर्व शालेय शिक्षणाचा वाटा महत्त्वाचा
  बालकांच्या विकासामध्ये पूर्व शालेय शिक्षणाचा सिंहाचा वाटा असून प्रशिक्षणार्थी अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी प्रशिक्षण सत्र मन लावून पूर्ण करावे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना पूर्व शालेय शिक्षणाबाबत स्वयंभू करून अंगणवाडीच्या पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणेचे आवाहन केले. यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा, घरोघरी पोषण या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्या असे आवाहन सिईओ स्वामी केले.

  पूर्व शालेय प्रशिक्षण सत्र घेणार
  जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख म्हणाले, पूर्व शालेय शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया असल्याने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पूर्व शालेय शिक्षणाबाबतचे आरंभ प्रशिक्षण सत्र दिनांक ३  ते ७ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहेत. प्रशिक्षण सत्र यशस्वी करणे साठी बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, रेश्मा पठाण, अनुराधा शिंदे, अनुराधा परूरकर, शोभा तडलगी, सुगराबी नदाफ व सौ वालकोळी यांनी प्रयत्न केले.