Entry Ban for Vehicles Coming to Alandi on the Occasion of Kartiki Yatra will be implemented from December 5
Entry Ban for Vehicles Coming to Alandi on the Occasion of Kartiki Yatra will be implemented from December 5

  पिंपरी : कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने लाखो भाविक आळंदीत आगमन करत असतात. ९ डिसेंबर कार्तिकी एकादशी आहे, तर ११ डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. त्या पार्श्वभूमीवर या कालावधीत वारकरी, दिंडीकऱ्यांचीवाहने, अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली.

  ७ मार्गावर बॅरिकेड्स नाकाबंदी

  आळंदीकडे येणाऱ्या ७ मार्गावर बॅरिकेड्स नाकाबंदी करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांसाठी प्रशासनाकडून ६ ठिकाणी फोरव्हीलर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वारीदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

  प्रवेश बंदी करण्यात येणार मार्ग आणि पर्यायी मार्ग
  १) मोशी चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रेवश बंदी. पर्यायी मार्ग – जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्ग, चौविसावाडी/विश्रांतवाडी/भोसरी
  २) भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौकमार्गे चोविसावाडी/ विश्रांतवाडी/ भोसरी. भोसरी चौक-मॅगझीनचौक मार्गे विश्रांतवाडी. मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे.
  ३)चिंबळीफाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – जय गणेश चौक, अलंकापुरम चौक मार्गेचोविसावाडी/विश्रांतवाडी / भोसरी. भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी.
  ४) आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्गा -जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरमचौक मार्गे चोविसावाडी / विश्रांतवाडी / भोसरी. भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी.
  ५)चाकण-वडगांव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयळी-मरकळगाव मार्गे पुणे
  ६) मरकळमार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – धानोरे फाटा – चऱ्होली फाटा मार्गे भोसरी-विश्रांतवाडी.
  ७) पुणे-दिघी मॅगझीन चोक मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – भोसरी मार्गे-मोशी-चाकण. अलंकापुरम – जयगणेश साम्राज्य चौक मार्गे-चाकण. चऱ्होली फाटा – धानोरीफाटा मार्गे – मरकळ- पुणे.
  —पार्किंगची व्यवस्था –
  -वडगांवकडून येणाऱ्या वाहनांसाठी चांगदेव महाराज विश्रांतवडाजवळी मोकळी जागा. वडगाव रोडवरील नगरपरिषद पार्किंग.
  -चाकण आळंदी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी इंद्रायणी हाॅस्पिटल समोर.
  -आळंदी तसेच चिंबळी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी बोपदेव चौकाजवळ मुंगसे पार्किंग.
  -देहूगाव, मोशी, हवालदार वस्ती फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी वहिले पार्किंग व ज्ञानविलास काॅलेज डुडुळगाव, कचरे हाॅस्पिटलसमोर.
  – यासह विविध ठिकाणी शुल्क भरून पार्किंगची व्यवस्थाही असणार आहे.
  —–एसटी बस / पीएमपीएम ठिकाणे –
  – सर्व ठिकाणी जाण्यासाठी योगीराज चौक येथील एसटी बसस्टॅड, (फक्त एसटी बस)
  – देहूकडे जाण्यासाठी डुडुळगाव जकात नाका येथे एसटी आणि पीएमपी बस स्टॅंड
  – पुण्याकडे जाण्यासाठी चऱ्होली फाटा येथे एसटीबस आणि पीएमपी स्टॅंड

  —आळंदी पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक व दिंडीकऱ्यांसाठी वाहन पासची सुविधा
  यात्रे दरम्यान आळंदीतून बाहेर जाणारे कामगार वर्ग व आवश्यक कामासाठी स्थानिकांना तसेच दिंडीकऱ्यांच्या वाहनांना आळंदी पोलिसस्टेशन येथे पासची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार दि.2 पासून पास देण्यात येणार आहेत. पास अर्जासोबत वाहनाच्याकागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. दुचाकीसाठी पासची आवश्यकता नाही,अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनकडून देण्यातआली आहे.