लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच मतदान केंद्रात सापाची एंट्री; अन् मग…

लोकसभा निवडणुकीसाठी आज (दि.19) मतदान सुरु आहे. हे मतदान सकाळी सात वाजता सुरुवात झाले असून, मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावला जात आहे. असे असताना नागुपरातील एका मतदान केंद्रावर सापाने एंट्री (Snake in Voting Center) केली अन् एकच धावपळ झाली. 

    नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी आज (दि.19) मतदान सुरु आहे. हे मतदान सकाळी सात वाजता सुरुवात झाले असून, मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावला जात आहे. असे असताना नागुपरातील एका मतदान केंद्रावर सापाने एंट्री (Snake in Voting Center) केली अन् एकच धावपळ झाली.

    नागपुरातील केडीके महाविद्यालयात हा प्रकार घडला. येथील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्र. 5 च्या बाहेर सकाळी दहा वाजताच्या सुमारास सापाने प्रवेश केला. साप दिसताच एकच गोंधळ उडाला. यावेळी मोहनीश मोहाडीकर या युवकाने मतदानासाठी गेलेल्या नितीश यांना फोन केला. वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे सचिव नितीश भांदककर यांना सांगितले.

    याची माहिती मिळताच भांदककर यांच्यासह इतर अनेकजण मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान कक्षाच्या बाहेरील झुडपांमध्ये सुमारे अडीच फूट लांबीचा विषारी साप आढळून आला. या सापाला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.