मढ कथित स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण खात्याची नोटीस

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळाप्रकरणी राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांना नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महापालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  मुंबई : मढमधील कथित स्टुडिओ घोटाळाप्रकरणी (Studio Scam) राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने (Environment Ministry) माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना नोटीस (Notice) जारी केली आहे. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी (Collector Of Mumbai) आणि महापालिकेला (BMC) कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, असलम शेख – मढ मार्वे एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे.

  किरीट सोमय्यांचे आरोप
  अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी ३०० कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात सीआरझेड नियमांच उल्लघन केलं आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती. ज्या जागेवर २०१९ साली काही नव्हते तिथे २०२१ ला स्टुडिओ उभारला आहे. अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचं सांगितलं जातं आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागानं सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणी साठी परवनगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनी याला भेट दिली त्याचे फोटो आहेत ते आम्ही योग्य वेळी दाखवू. या प्रकरणात कोस्टल झोन ऑथेरीटी यांना पत्र लिहिले आहे.

  अस्लम शेख यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
  किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी ३०० कोटी प्रकरणी कागदपत्र संबंधित यंत्रणांकडे दिल्याचा सोमय्यांनी दावा केला होता. किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी अस्लम शेख यांच्यासोबतच भाजप नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. एकाच गाडीतून हे दोघेही फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या.