दिवाळीनंतर गुढीपाडव्यालाही ‘आनंदाच्या शिधे’चा ‘मेवा’ सामान्यांच्या पदरी नाहीच; उद्या गुढीपाडवा पण अद्याप दुकानात ‘आनंदाचा शिधा’ पोहचलीच नाही, लोकांकडून संताप…

आनंदाच्या शिधावाटपाला उशीर होणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे. सर्वसामान्यांचा गुढीपाडवा गोड व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून शिधा वाटप केले जाणार होते. पण, काही ठिकाणी शिधा पोहचला नाही. त्यामुळे उद्या गुढीपाडवा कसा साजरा होणार असा संतप्त सवाल लोकांकडून विचारला जात नाही.

मुंबई: राज्य सरकारने (State government) सामान्यांची दिवाळी (Diwali) गोड करण्यासाठी शंभर रुपयात पाच जिन्नस देण्याचा निर्णय घेत लोकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडल्याचे चित्र होते. शंभर रुपयांतील आनंदाची शिधा  (Anandachi shidha) घेण्यासाठी लोकांनी दिवाळीत गर्दी केली होती. पण अनेकांच्या पदरी निराशाच पडली होती. त्यानंतर आता गुढीपाडावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Gudipadava and Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त शंभर रुपयात आनंदाची शिधा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पण उद्या गुढी पाडवा आला तरी अनेक ठिकाणी सरकारचा हा आनंदाचा शिधा पोहचला नाही, असं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळ लोकांनी नाराजी व्यक्त केली असून, संतापाची भावना आहे.

दिवाळीनंतर आता आनंदाचा शिधा…

गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पण सरकारी संपाचा परिणाम या शिधा वाटपावर झाला. गेली आठवडाभर सरकारी कर्मचारी संपावर होते. याचा परिणाम शिधा वाटपाला आता उशीर होणार आहे. उद्या गुढीपाडवा असला, तरी काही ठिकाणी अद्याप शिधा पोहचलेला नाही. आनंदाचा शिधा घेण्यासाठी मोठ्या आशेने आलेल्या गोरगरीब कुटुंबांच्या निराश होऊन मोकळ्या हाताने परत जावं लागत आहे. आज (मंगळवार) सकाळपासूनच अमरावतीत तसेच राज्यातील अन्य भागात रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा घेण्यासाठी गोरगरीब ग्राहकांनी गर्दी केली होती. परंतु दुकानात शिधाच आला नसल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. यामुळं लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

संपाचा फटका आनंदाची शिधावर…

जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर होते. याचा परिणाम शिधा वाटपावर होताना दिसत आहे. तसेच याचा फटका आनंदाची शिधा याला बसला असून, आता यामुळं उशीर होत आहे. उद्या गुढीपाडवा असला, तरी काही ठिकाणी अद्याप शिधा पोहचलेला नाही. ‘आनंदाची शिधा’ यात सरकारकडून पाच जिन्नस देण्यात येणार आहेत, यामध्ये डाळ, तेल, साखर, रवा असे जिन्नस दिले जाणार आहेत. आनंदाच्या शिधावाटपाला उशीर होणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे. सर्वसामान्यांचा गुढीपाडवा गोड व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून शिधा वाटप केले जाणार होते. पण, काही ठिकाणी शिधा पोहचला नाही. त्यामुळे उद्या गुढीपाडवा कसा साजरा होणार असा संतप्त सवाल लोकांकडून विचारला जात नाही.