आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकरांना केलं मोठं आवाहन, म्हणाले…

मुंबईतील लोक आमचीच आहेत, मुंबईतला प्रत्येक माणूस आमचं स्वागत करेल अशी अपेक्षा. त्यांनी आमचे स्वागत करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

     छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तीन वेळा अवधी दिला. मात्र, सरकारने मराठा समाजास चर्चेत गुंतवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता अंतिम लढ्यासाठी मराठ्यांनी तयार राहावे. राज्य सरकारने मुंबईत १८ तारखेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे मी २० जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहे,’ असे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.
    १० लाख गाड्यांसह ३ कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये धडकणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही.. असा इशाराही त्यांनी दिलाय. “आमची सगळी तयारी झाली आहे, आम्ही सज्ज आहोत, आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही. असंही ते छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
    मुंबईतला प्रत्येक माणूस स्वागत करेल
    “आम्ही शेतातली काम आटोपून मुंबईला येण्याचे नियोजन केले आहे. मुंबईतील आंदोलन हे सर्वात मोठे असेल. सर्व कामे आटोपून मुंबईत धडक द्यायची आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मुंबईतील लोक आमचीच आहेत, मुंबईतला प्रत्येक माणूस आमचं स्वागत करेल अशी अपेक्षा. त्यांनी आमचे स्वागत करावे…” असे खास आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    एक तासही वेळ देणार नाही
    यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “सरकारकडून आमची फसवणूक करण्यात आली. आतपर्यंत गेलेल्या बळीला पूर्णतः सरकार जबाबदार आहे, यापुढे सरकारला एक तासही वेळ देणार नाही. लवकर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मराठे तुटून पडल्याशिवाय राहणार नाही…” असे जरांगे पाटील म्हणाले.
    छगन भुजबळांना इशारा
    “भुजबळ फक्तं स्वार्थासाठी राजकारण करतं आहेत. त्यांनी ओबीसी व मराठा समाजात भांडण लावण्याचे काम केले. त्यांना गोळ्या चालू करा.. असा टोला जरांगे पाटलांनी लगावला. तसेच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर यांच्याकडे बघतो…” असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.