नागरिकांना त्रास झाला तरी चालले पण मुख्यमंत्र्यांना त्रास नको, महापालिकेचे दुर्लक्ष

चांगले रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, स्वच्छता या सारख्या मूलभूत सोयी सुविधा पुरविणारी महापालिका गेल्या अनेक वर्षापासून कमी पडताना दिसून येत आहे.

    रस्त्यावरील खड्ड्यामुळे दरराेज कुठे ना कुठे अपघात होता. वारंवार तक्रार करुन देखील महानगरपालिका दुर्लक्ष करते. मुख्यमंत्री कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच खळबळून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना खड्यांचा त्रास होऊ नये म्हणून खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. हे पाहून नागरीक हैराण होते.

    कल्याण डोंबिवली महापालिका वादग्रस्त विषयामुळे चर्चेत असते. केडीएमसीच्या नव्या आयुक्त इंदूराणी जाखड यांना पदभार स्विकारुन काही महिने उलटून गेले तरी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ज्या बदल्यांची अपेक्षा होती. ती कुठे दिसत नाही. चांगले रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, स्वच्छता या सारख्या मूलभूत सोयी सुविधा पुरविणारी महापालिका गेल्या अनेक वर्षापासून कमी पडताना दिसून येत आहे.

    आता तर कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार याची माहिती महापालिका अधिकारी वर्गास मिळाली. कल्याण पश्चिमेतील फडके मैदान नजीकच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने दुपारी तातडीने सुरु केले. हे पाहून नागरीक हैराण झाले आहेत.